काकोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का... - Maratha Darbar

Breaking

Tuesday, October 13, 2026

काकोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का...


 काकोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का

आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश


( मुक्ताईनगर राहुल पाटील) 

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन तसेच मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या विकासात्मक दृष्टिकोनावर विश्वास व्यक्त करत काकोडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.


एकनाथ शिंदे साहेब व आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे आणि विकासकामांना गती देण्याचे काम सुरू आहे. आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून काकोडा येथील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या पक्षप्रवेशामुळे काकोडा परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार आहे.


शिवसेनेत प्रवेश केलेले पदाधिकारी व कार्यकर्ते...


ग्रामपंचायत सदस्य मनोज हिवरकर, विलास पाटील, माजी सरपंच निजाम शाह, माजी ग्रामपंचायत सदस्य भागवत बगाडे, रामराव पाटील, शेषराव पाटील, सोपान खोले, शहाजी पाटील, वासुदेव पाटील, शेषराव उखर्डा पाटील, किशोर खोले, शामराव पाटील, शब्बीर शहा, मंगेश खोले, दिनेश खोले, तुषार पाटील, अमोल भोलानकर, रामेश्वर भोलानकर, संदीप भोलानकर, भागवत गुरव, अमोल घाटे, कदीर शाह, रोशन शाह, सफिक शाह, इमाम शाह, रामदास भोलानकर, ऋषि पाटील, राहुल पाटील आणि महादेव भोलानकर आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.


शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटूभाऊ भोई, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, तालुकाप्रमुख नवनीत पाटील, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान, लाडकी बहीण जिल्हाध्यक्ष राहुल पाटील सर, तालुका संघटक महेंद्र मोंढळे, उपतालुकाप्रमुख पंकज पांडव, विभागप्रमुख विनोद पाटील, सतीश नागरे, रावेर लोकसभा संपर्कप्रमुख सोशल मीडिया दीपक वाघ सर, राजूभाऊ वानखेडे, शहरप्रमुख मंगेश पाटील, शैलेश पाटील, नगरसेवक वसंत भलभले आणि गणेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


काकोडा गावात व परिसरात या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक बळात वाढ झाली असून, आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांसाठी आणि विकासकामांसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.