- Maratha Darbar

Breaking

Wednesday, September 9, 2026

 पुनर्वसित गावठाण गट ग्रामपंचायत कार्यालय, पातोंडा, ता. नांदुरा, जि. बुलडाणा,

नविन गावठाण येथील पिण्याचे पाणी व रस्ते दुरुस्ती आणि कामचुकार कर्मचाऱ्यांवर कडक कार्यवाही करणेबाबत.

अशांत सोपान रणित

रा. पातोंडा, ता. नांदुरा जि. बुलडाणा

वरील विषयास अनुसरुन आपणास गावकऱ्यांनी  नविन गावठाण पातोंडा येथे ग्रामपंचायत ला बराचकाही शासनाचा निधी जमा आहे. परंतु आजरोजी या गावामध्ये कोणत्याच प्रकारचे काम आजपर्यंत झालेले नाही व नागरिकांना मिळणाऱ्या मुलभुत सुविधा मिळालेल्या नाही. शासन निर्णयानुसार बरेच वर्ष झाले नविन गाव पुनर्वसन झालेले आहे. त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, व पथदिवे काम आजपर्यंत पुर्णपणे झालेले नाही. आपल्या ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी अरेराई व कामचुकारपणा करत असल्यामुळे पाणीपुरवठा पुर्णपणे विस्कळीत झालेला आहे. पाणीपुरवठा कर्मचारी हा गावात न राहता नांदुरा येथे राहतो तो स्वता:ची शासकीय जबाबदारी पार पाडत नाही. तो नांदुरा येथून फोनव्दारे दुसन्यांना कामे सांगतो. त्यामुळे गावातील सर्व जनतेंना या कर्मचाऱ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा त्रास होतो.श्रश्रश्रश्रश्र

मा. महोदय, मी आपण निवेदन देवून 7 दिवसाचा कालावधी दिला होता. परंतु आपण कुठल्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही व कामे करण्यात आली नाही. जर हे काम झाले नाही तर दि. 27/07/2026 वार सोमवार सकाळी 10.00 वा. नविन पुनर्वसित गावठाण ग्रामपंचायत कार्यालय, पातोंडा यांच्या समोर आमरण उपषोन सुरु आहे