नांदुरा पंचायत समितीसमोर उपोषण सुरू; ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराविरोधात आंदोलन तीव्र - Maratha Darbar

Breaking

Tuesday, May 5, 2026

नांदुरा पंचायत समितीसमोर उपोषण सुरू; ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराविरोधात आंदोलन तीव्र

 नांदुरा पंचायत समितीसमोर उपोषण सुरू;


 ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराविरोधात आंदोलन तीव्र 


(नांदुरा प्रतीनीधी)


नांदुरा – तालुक्यातील अवधा बु. ग्रामपंचायतीत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार, अपूर्ण विकासकामे आणि निकृष्ट दर्जाच्या कामांविरोधात दि. 5/05/26 पासून नांदुरा पंचायत समितीसमोर महिला ग्रामपंचायत सदस्य सह तीन गावाकऱ्यांकडून उपोषण सुरू करन्यात आले आहे. संबंधित तक्रारदारांनी यापूर्वी गटविकास अधिकारी (BDO) यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती; मात्र समाधानकारक कारवाई न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात आला.

उपोषणकर्त्यांचा आरोप आहे

 की, सन २०२३ ते २०२५ दरम्यान विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याचे दाखवले गेले, परंतु प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण आहेत. व काही कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत. काही कामे पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवूनही प्रत्यक्ष ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत झालेल्या कामांमध्येही अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दलित वस्त्यांमधील पेवर ब्लॉक.बांधकामे निकृष्ट दर्जाची असल्याचे नमूद करत, संबंधित बिलांची आणि खर्चाची सखोल चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. “काम किती झाले आणि बिल किती काढले” याची पारदर्शक तपासणी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

माहिती अधिकाराद्वारे वारंवार माहिती मागूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याचा आरोपही करण्यात आला. त्यामुळे ग्रामसेवक, सरपंच व संबंधित कंत्राटदारांवर तात्काळ कारवाई करून दोषींना जबाबदार धरण्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, उपोषण सुरू झाल्याने प्रशासनाची धावपळ वाढली असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून तोडग