शेगांव तालुक्यात शासन आदेश कागदावरच ; घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती मिळणार कधी..
तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज !
*....राजु पाटील घाटे पंन्ना....✒️*
शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत गरजू घटकांना हक्काचा निवारा मिळवा या करिता घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून गोरगरीब गरजूंना पक्की घर बांधून लाभ देण्यात येते. मात्र प्रत्यक्ष घर बांधताना लाभार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच जानेवारी २०१९ मध्ये घरकुल बांधकामासाठी ५ ब्रास मोफत वाळू ( रेती ) देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली होती.तसे शासन आदेशही निघाले. ही योजना प्रत्यक्षात राबवली जात नसल्याने केवळ कागदावरच असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
शेगांव तालुक्यात काही प्रमानात वाळूघाट लिलाव प्रक्रिया पार पडली असून उर्वरित घाटांची लिलाव प्रलंबित आहेत. त्यामुळे बांधकामासाठी वाळू ( रेती ) मिळणे कठीण झाले आहे. यापूर्वी घरकुलाचा तीन महिन्यापासून अनुदान जमा झाला नाही. सदर निधी जमा झाल्याबाबतचे (क्रेडीट कन्फर्मेशन) प्रधानमंत्री आवास योजनेच्या ऑनलाईन पोर्टल च्या वेबसाईटवर तांत्रिक अडचणीमुळे अनुदान रखडले होते. वेबसाईट सुरु झाली असून मागील आठवड्यात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
शासन नियम व अटींनुसार घरकुल मंजूर झाल्यापासून एक वर्षाच्या आतमध्ये घरकुलाचे बांधकाम पूर्ण करणे गरजेचे आहे. दुसरीकडे घरकुल योजनेअंतर्गत अनुदान अनियमित असून रेतीही मिळत नसल्याने घरकुलांचे बांधकाम पूर्ण कसे करावे,असा प्रश्न लाभार्थ्यामधून उपस्थित होत आहे. घर बांधकामांसाठी मंजूर झालेल्या रकमापैकी बरेच पैसे रेती खरेदीसाठी जात असल्याने या स्थितीत घरकुल बांधायचे की रेतीची खरेदी करायची,असा सवाल घरकुल लाभार्थ्याकडून उपस्थित होत आहे. घरकुल लाभार्थ्यांच्या गैरफायदा घेत काही वाळू ( रेती ) व्यवसायिक बेकायदेशीरपणे रेती विक्री करत असल्याचे चित्र आहे. मोफत ५ ब्रास रेती उपलब्ध करून देणारा तो शासन जी आर उपलब्ध असताना तालुका प्रशासनाची उदासिनता चव्हाट्यावर दिसून येत आहे.
घरकुलाच्या बांधकामासाठी रेती मिळावी यासाठी लाभार्थी ग्रामपंचायत,पंचायत समिती,तहसील कार्यालयांचे त्यांना उंबरठे झिजवावे लागत आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेली मोफत वाळू ( रेती ) ची घोषणा केवळ नावापुरतीच राहिली असल्याच्या प्रतिक्रिया घरकुल लाभार्थ्यांमधून व्यक्त होत आहेत.यामुळे शासनाच्या योजनांवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. याकडे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी लक्ष देऊन घरकुलासाठी मोफत रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी तालुक्यातील लाभार्थ्याकडून होत आहे.
*👉🏻 चौकट बॉक्स...*
*घरकुल लाभार्थ्यावर महागडी वाळू ( रेती ) घेण्याची वेळ ..*
