बुलडाणा जिल्ह्यास नवे जिल्हाधिकारी: प्रविण कुमार देवरे यांची नियुक्ती
| प्रतिनिधी:अरुण सुरवाडे
(IAS)प्रविण कुमार देवरे यांची बुलडाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली असून प्रशासनात नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महारा
ष्ट्र राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख असलेले देवरे यांनी यापूर्वी पशुसंवर्धन विभागात आयुक्त म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे.
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र मध्ये कार्यरत असताना त्यांनी विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनगणना आणि विभागीय उपक्रमांचे काटेकोर नियोजन केले होते. त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रशासनात पारदर्शकता आणि गती वाढल्याचे मानले जाते.
आता बुलडाणा जिल्हा येथे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळेल, तसेच नागरिकाभिमुख प्रशासनाला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
देवरे यांच्या नियुक्तीमुळे महसूल, आरोग्य, शिक्षण व ग्रामीण विकास क्षेत्रात प्रभावी बदल घडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निवारण आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर त्यांचा भर राहणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध घटकांकडून त्यांच्या स्वागताची तयारी सुरू असून, नव्या नेतृत्वाकडून सकारात्मक बदलांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

