२ एप्रिल रोजी भव्य दिव्य अवधा देवी आदिशक्ती जगदंबा जय वळेखन माऊली यात्रा महोत्सव
अवधा.... सोपान पाटील मो. 7028259008
नांदुरा:-नांदुरा येथून ८ कि.मी. अंतरावर असलेले अवधा तालुका नांदुरा येथे धर्मगुरू स्वर्गीय दासफुले महाराज फुलसिंग डाबेराव विदर्भ व्यास पुरस्कार प्राप्त ३०० हून अधिक ग्रंथाचे लेखक, कवी यांच्या प्रेरणेने संपूर्ण देशातील समस्त आदिवासी पारधी टाकोनकार समाज बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या आदिशक्ती जगदंबा जय वळेखन माऊलीचा भव्य अवधा देवी दर्शन यात्रा महोत्सव २ एप्रिल ३ एप्रिल २०२६ गुरुवार व शुक्रवार रोजी श्री क्षेत्र आदिशक्ती जगदंबा वळेखण देवी संस्थान अवधा येथे आयोजित केला आहे. यामध्ये २ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता आरती, १२.३० ते २ वाघरी बोली भाषा प्रचार व प्रबोधन, ६.३० ते रात्री ९ महाप्रसाद (खिचडा), सायंकाळी ७ वाजता महाआरती, रात्री ८ ते ९ सामाजिक प्रबोधन, तसेच २ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता पासून पुढे रात्रभर खुळ
भजन गायन व अखंड माउली जागरण सकाळी ६ वाजेपर्यंत व ३ एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी ६.३० वाजता सर्व आदिवासी पारधी टाकोनकार समाज बांधवांच्या उपस्थितीत महाआरती घेण्यात येईल व सकाळी ८ वाजता अल्पोपहार झाल्यानंतर भव्य अवधा देवी जय वळेखन माऊली यात्रेचे समापन करण्यात येईल.. तरी सर्व आदिवासी पारधी टाकोनकार समाज भाविक भक्तांनी अवधा देवी आदिशक्ती जय वळेखन माऊलीचे दर्शन घेऊन जीवनाचे सार्थक करावे , असे आवाहन विश्वस्त सल्लागार व यात्रा उत्सव समिती श्रीक्षेत्र आदिशक्ती जगदंबा वळेखन देवी संस्थान अवधा गड तालुका नांदुरा यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. तरी नांदुरा नारखेड ईसापुर एस.टी. बस सुरू आहे तसेच नांदुरा रेल्वे गेट पासून खाजगी ऑटो रिक्षा चालू आहेत. असे अवधा देवी संस्थानच्या वतीने कळविण्यात आले आहे.
