नांदुरा शहरातील वाहतूक शिस्त ढासळली शहरात ट्राफिक नियमांचे उल्लंघन
नांदुरा प्रतिनिधी (अरुण सुरवाडे) – नांदुरा शहरातील वाहतुकीची शिस्त पुन्हा ढासळली आहे अशी परिस्थिती दिसत आहे.
गत वर्षी (2025) शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा प्रवाह वाढला असताना, प्रशासनाने एक अनुभवी ठाणेदार शहरात नेमला होता. त्या काळात ट्राफिक पोलीसांच्या मदतीने नियमांचे पालन करण्यासाठी वाहनांची वाहतूक सुकर करण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे बदल करण्यात आले होते.त्या काळात शहरातील मुख्य रस्त्यावरील गर्दीत सुधारणा, रस्त्यांवर योग्य चिन्हे व नियंत्रण यामुळे वाहनचालक व फेरीवाले यांच्यासह भाजीपाला विक्रेते यांना नियमांचे पालन करण्याची भावना वाढली होती.
पण काही महिने पूर्ण होताच त्या ठाणेदाराची दुसऱ्या ठिकाणी बदली झाली आणि त्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था पुन्हा पूर्व-स्थितीकडे परतल्याचे दिसत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की काही ठिकाणी वाहन (parking) अनियमितपणे होत आहे, ट्राफिक नियंत्रण यांसाठी नियमित तपासणी कमी झाल्यामुळे रस्त्यांवर गर्दी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणेदार जयंत सातव यांनी वाहतूक व्यवस्था यावर वेळोवेळी लक्ष न देता योग्य ती कार्यवाही केली नसल्याने शहरातील ट्राफिक सीस्त ढासळली .
विशेष म्हणजे, मागील (2025)काळात नांदुरा पोलीसांनी गुटखा जप्ती व तरुणांवर कारवाई यासारख्या इतर कायदेशीर कामांमध्येही सक्रिय भूमिका घेतली होती, पण आता वाहतूक शिस्त राखण्यासाठी नियमित व्यवस्था दिसत नसल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या गंभीर बाबीवर नवीन आलेले नांदुरा ठाणेदार आदित्य सिहं साहेब यांनी शहरात रोज सकाळी व संध्याकाळी पैदल रूटमार्च काडून कार्यवाही करावी अशी अपेक्षा जनतेमधून केल्या जात आहे
