अवधा बु येथे भागवत कथा ज्ञानयज्ञ अखंड हरीनाम सप्ताहामध्ये राधा कृष्ण यांचा विवाह संपन्न - Maratha Darbar

Breaking

Wednesday, March 18, 2026

अवधा बु येथे भागवत कथा ज्ञानयज्ञ अखंड हरीनाम सप्ताहामध्ये राधा कृष्ण यांचा विवाह संपन्न

 अवधा बु येथे भागवत कथा ज्ञानयज्ञ अखंड हरीनाम सप्ताहामध्ये राधा कृष्ण यांचा विवाह संपन्न 




(नांदुरा,सोपान पाटील,_) 

अवधा बु. येथे हनुमान मंदिरात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा गुरुवार दि. १२ मार्च २०२६ रोजी सुरू झाला असून या सप्ताहात प्रमुख कथावाचक म्हणून ह.भ.प. आचार्य योगेश महाराज किन्होळकर, किन्होळा यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सप्ताहादरम्यान दररोज सकाळी काकडा आरती, भागवत कथा वाचन तसेच सायंकाळी हरिपाठ आणि रात्री हरिकीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.यामुळे अवधा गावात भक्तीमय वातावरण झाले असून सर्व गावकरी एकजुटीने व तण मन धनाने सहकार्य करत आहेत सप्ताहाचा गुरुवार दि. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प. आचार्य योगेश महाराज किन्होळकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन सप्ताहाचा समारोप होईल. तसेच  दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, अवधा बु. यांच्या वतीने करण्यात आले आहे.