नांदुरा नगरपरिषदेत प्रसाधनगृहाला कुलूप; प्रशासन व नगरसेवकांचे दुर्लक्ष - Maratha Darbar

Breaking

Friday, March 20, 2026

नांदुरा नगरपरिषदेत प्रसाधनगृहाला कुलूप; प्रशासन व नगरसेवकांचे दुर्लक्ष

 नांदुरा नगरपरिषदेत प्रसाधनगृहाला कुलूप; प्रशासन व नगरसेवकांचे दुर्लक्ष




नांदुरा शहरातील नगरपरिषद परिसरात सार्वजनिक प्रसाधनगृहाला कुलूप लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक असलेले हे प्रसाधनगृह बंद ठेवण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, नगरपरिषदेत प्रशासकीय अधिकारी व नगरसेवक उपस्थित असूनही या गंभीर समस्येकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

, ज्येष्ठ नागरिक तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, प्रसाधनगृह बंद असल्यामुळे त्यांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे. यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीनेही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

नागरिकांनी प्रशासनाला तात्काळ प्रसाधनगृह सुरू करून नियमित स्वच्छता व देखभाल सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, संबंधित अधिकारी व नगरसेवकांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.