*"खाकी वर्दीची प्रतिष्ठा हफ्त्यासाठी गहाण,
* नांदुरा पोलीस ठाण्याच्या सावलीत अल्पवयीन मुलांचे व व्यसनाधीन लोकांचें भविष्य नकली देशी, विदेशी दारू, आणि जुगारात !"*
नांदुरा प्रतिनिधी:अरुण सुरवाडे
नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीतील खुलेआम सुरू असलेल्या अवैध देशी विदेशी दारू. विमल गुटखा वाहतूक व विक्रीसह,वरली मटकामुळे अल्पवयीन मुलांचे आणि महिलांचे भविष्य धोक्यात येत आहे.आजपर्यंत ग्रामीण भागात बरेचसे गंभीर गुन्हे चोरी, खून, विनयभंग सारखे गुन्हे दारुड्याकडून घडलेले आहेत, शाळकरी विद्यार्थी देखील मटका लावून हार जीतचा निकाल पाहण्यासाठी रांगेत उभे राहताना दिसत आहेत. नांदुरा शहर व गावखेड्यातील चौक, हॉटेल्स, व बाजारपेठा वरली मटका जुगाराचे केंद्र बनले आहेत.आता उन्हाळा लागला यामुळे चोरीचे प्रमाण वाढत आहेत याकरिता नांदुरा ठाणेदार श्री.जयवंत सातव साहेब व
आय. पी. एस. अधिकारी आदित्य सिहं नांदुरा ठाणा प्रभारी यांना विनंती—खाकी वर्दीची प्रतिष्ठा हफ्त्याखातर गमावू नका. लहान मुलांचे व महिलांचे भविष्य वाचवा ना,पो,स्टेशनचे सर्व बिट इंचार्ज यांना त्वरित कारवाईचे आदेश देऊन अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करा! व अवैधरित्या एकाच ग्राहकाला नियमाच्या वर देशी दारूचा माल विकणाऱ्या आणि अवैध देशी दारूचा धंदा करणाऱ्याना माल पुरवणाऱ्या परवाना धारक दुकानांची डेली विक्री,व स्टॉक रजिस्टरची तपासणी करून कार्यवाही करा व दारुड्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या घटना टाळा अन्यथा स्वार्थामुळे जनतेचे सेवकच (पोलीस)पुढील नुकसानिस जवाबदार असाल याची जाणीव ठेवून कार्यवाही करा ही जनतेची मागणी .
