*अखेर उच्च न्यायालयातून लाच लुचपत प्रकरणात शिवा उर्फ गजानन राजंनकार यांना जामीन मंजूर*
नागपूर.... सोपान पाटील
*लाच लुचपक प्रतिबंधक कायदा विशेष सत्र खटल 3/ 2015*
या प्रकरणात तीन आरोपी होते तीनही आरोपीसन 2017 नंतर जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव येथे सतत गैरहजर राहत असल्याकारणाने व न्यायालयाच्या कुठल्याही तारखेवर हजर राहत नसल्या कारणाने सन 2022 मध्ये सत्र न्यायालयाने पोलीस शिपाई पंजाबराव शेळके तसेच शिवा उर्फ गजानन राजनकर व योगेश अंबलके यांच्याविरुद्ध गैरसमारती पकडवारण जारी केला होता मात्र पोलिसांमार्फत 2026 पर्यंत सुद्धा सदरचा गैरजमानाची पकड वारांट ची बजावणी होऊ शकला नाही
दिनांक 27 1 2026 रोजी तिन्ही आरोपी स्वतःहून न्यायालयात गैरजमानती पकड वॉरंट रद्द करण्याकरता हजर झाले मात्र न्यायालयाने त्यांना सतत आठ वर्ष गैरहजर असल्याकारणाने तसेच गैरहजर असल्याबाबतची योग्य ती कारण मीमांसा देऊ न शकल्या कारणाने त्यांचा वॉरंट रद्द करण्याबाबतचा अर्ज फेटाऊन लावला व त्यांना ताब्यात घेऊन पोलीस कोठडीत पाठवलेहोते तसेच त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव येथे नव्याने जमानात मिळणे करता अर्ज केला होता मात्र तो देखील माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश खामगाव यांनी फेटाळून लावला
होता त्यानंतर शिवा राजनकर यांनी एडवोकेट विद्यासागर आलोणे एडवोकेट प्रणव नाफडे व जयंत कदम,यांचे मार्फत तर योगेश अमलके यांनी एडवोकेट अनंता कानोळजे व उदय कपले यांचे मार्फत उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे जमानत मिळण्यासाठी याचिका सादर केली होती
त्यावर प्रदीर्घ सुनावणी होऊन माननीय उच्च न्यायालय यांनी एडवोकेट विद्यासागर आलोने एडवोकेट जयंत कदम यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत शिवा राजनकर व योगेश अमलके यांना जामीन मंजूर केला आहे व त्यात विशेष अट टाकली आहे की जर ते यानंतर तारखेवर गैरहजर राहिले तर त्यांचा जामीन रद्द करण्याचा सरकारला अधिकार राहील सदरच्या जमानतीवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले होते शिवा उर्फ गजानन मनोहर राजनकर यांच्या वतीने उच्च न्यायालय नागपूर येथे ज्येष्ठ विधीज्ञ एडवोकेट विद्यासागर अलोणे,प्रणव नाफडे व जयंत कदम यांनी काम पाहिले तर योगेश अंबळके यांच्या वतीने ॲड उदय कपले व अनंत कानोळजे यांनी काम पाहिले
