अल्पवयीन मुलाशी गैरकृत्य; ६० वर्षीय आरोपीवर pocso अंतर्गत गुन्हा दाखल* - Maratha Darbar

Breaking

Wednesday, February 11, 2026

अल्पवयीन मुलाशी गैरकृत्य; ६० वर्षीय आरोपीवर pocso अंतर्गत गुन्हा दाखल*

 *अल्पवयीन मुलाशी गैरकृत्य; ६० वर्षीय आरोपीवर pocso अंतर्गत गुन्हा दाखल*



नांदुरा (जि. बुलडाणा) : सोपान पाटील का. संपादक (7028259008)

       वडनेर भोलजी येथे पंचमुखी हनुमान मंदिराजवळ अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य केल्याप्रकरणी ६० वर्षीय आरोपीविरुद्ध POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अप क्र. 81/2026 अन्वये कलम 8 व 12 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) 2012 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी ही १६ वर्षीय पीडित मुलगा असून वडनेर येथील रहिवासी आहे.

दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिराजवळ (एन.एच. 53) येथे आरोपी सुनील सातव (वय अंदाजे 60 वर्षे, रा. वडनेर भोलजी, ता. नांदुरा, जि. बुलडाणा) यांनी पीडितेसोबत अश्लील व गैरवर्तन केल्याची तक्रार दाखल झाली आहे.

पीडितेच्या तोंडी फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीविरुद्ध कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.