महात्मा फुले हायस्कूल निमगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी.. निमगाव नांदुरा .., - Maratha Darbar

Breaking

Friday, February 20, 2026

महात्मा फुले हायस्कूल निमगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी.. निमगाव नांदुरा ..,

 महात्मा फुले हायस्कूल निमगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी..

 निमगाव नांदुरा .., सोपान पाटील. का. संपादक (7028259008)



 महात्मा फुले हायस्कूल निमगाव येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2026 ला शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.के.आर.इंगळे सर तसेच मुख्याध्यापक श्री.एस. एस. गिऱ्हे सर,श्री.एस. डी. राठोड पर्यवेक्षक, कु.जे.एन.भोपळे पर्यवेक्षिका तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीमध्ये श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला तसेच गावातील श्री.छत्रपती शिवाजी चौक येथील पुतळ्याचे पूजन करण्यात आले रामदल चौकातील प्रतिमेचे सुद्धा पूजन करण्यात आले.

 प्रभात फेरी समाप्त झाल्यानंतर शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी भाषण स्पर्धा, एकांकिका,नाटिका यामध्ये उत्स्फूर्त  सहभाग घेतला. या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना ज्ञात झाली. सदर कार्यक्रमासाठी कार्यक्रम प्रमुख म्हणून श्री. एस. ए.इंगळे सर श्री.व्ही. बी.चव्हाण सर यांनी सहकार्य केले. तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग 8 मधील विद्यार्थिनी कु. दृष्टी काळे व कु.वैष्णवी वानखडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्ग आठ मधील कुमारी वृषाली पाऊलझगडे  या विद्यार्थिनींने केले.