भोटा गावात शिवस्मारक समिती अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती उत्साहात साजरी* - Maratha Darbar

Breaking

Friday, February 20, 2026

भोटा गावात शिवस्मारक समिती अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती उत्साहात साजरी*

 *भोटा गावात शिवस्मारक समिती अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती उत्साहात साजरी*




 शिवजयंतीनिमित्त महाप्रसादाचे व भव्य मिरवणूक व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

*छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भोटा ग्रामस्थांच्या वतीने* यावर्षी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते 


*शिवस्मारक समितीचे अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावात उत्साहाचे वातावरणात  शिवजयंती साजरी करण्यात आली* यावेळी शिवप्रेमींमध्ये आनंदाची लहर उसळली होती.

*शिवजयंती कार्यक्रमाची सुरुवातीला सकाळी ठीक 9.00 वाजता शिवप्रतीमेच्या मूर्तीपूजन  व महाआरती झाली* तसेच *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला* अभिवादन करण्यात आले

यानंतर *जिल्हा परिषद शाळे मधील मुला - मुलींनी शिवकालीन वेशभूषा व शिवगाथा सादर करून शिवरायांच्या चरित्रावर भाषण केले व पोवाडे गायले*

दुपारी *3.00 ते 6.00 सर्व शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला*


 *संध्याकाळी 7.00 वाजता शिवपुतळ्यापासून भव्य मिरवणूक सोहळ्याची सुरुवात होऊन* मिरवणुकीत ढोल-ताशे, भगवे पताके,   शिवजयंतीच्या जयघोषाने जल्लोषमय वातावरण तयार झाले होते.

*शिवस्मारक समितीचे अध्यक्ष शैलेश पाटील यांनी गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले*. पुतळा उभारणीसाठी लागणारी *सर्व कागदपत्रे, शासनस्तरावरील परवानग्या आणि आवश्यक प्रक्रियेची पूर्तता त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर पार पाडली*. त्यांच्या या प्रयत्नांना *ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून आज शिवस्मारक हे गावाचे अभिमानस्थान ठरले आहे*.


तरुणांना एकत्र आणून *शिवप्रेमाची ज्योत प्रज्वलित करण्यात शैलेश पाटील* यांनी घेतलेल्या पुढाकाराचे गावभर कौतुक होत आहे.

"*छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार भावी पिढीपर्यंत पोहोचावेत, यासाठी माझ्या परीने प्रयत्न करत राहणार आहे," असे  शैलेश पाटील यांनी सांगितले*.


ग्रामस्थ, महिला मंडळी व *युवकांनी एकदिलाने सहभाग नोंदवल्याने यावर्षीची शिवजयंती उत्सव शिस्तबद्ध, दिमाखदार आणि ऐतिहासिक सोहळ्यात पार पडली*.!