माटरगाव बु येथे भरारी महिला ग्राम संघामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली - Maratha Darbar

Breaking

Thursday, February 19, 2026

माटरगाव बु येथे भरारी महिला ग्राम संघामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली

 माटरगाव बु येथे भरारी महिला ग्राम संघामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम संघाच्या अध्यक्ष उर्मिलाताई रोठे तसेच उषाताई गायकी लक्ष्मीताई निखाडे ह्या होत्या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता सर्वप्रथम इयत्ता बारावीची विद्यार्थिनी कुमारी गायत्री निखाडे हिने पोवाडा सादर करून उपस्थित त्यांची दाद मिळवली  स्त्री शक्ती ग्राम संघाच्या कोषाध्यक्ष लक्ष्मी ताई निखाडे सविता ताई वांजे  यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आपले विचार प्रभावीपणे व्यक्त केले ग्राम संघाच्या अध्यक्ष रोटेताई यांनी ज्याप्रमाणे मासाहेब जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना रामायण व महाभारतातील गोष्टी सांगून शौर्य आणि न्यायाचे संस्कार दिले त्याचप्रमाणे प्रत्येक आईने आपल्या मुलाला चांगल्या गोष्टी सांगून शिक्षण द्यावे जेणेकरून प्रत्येक मुलगा हा आदर्श पुरुष बनेल असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणातून केले कार्यक्रमाचे  सुंदर संचालन ज्योतीताई जगताप यांनी तर आभार पूनम ताई हिवरखेडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूनम ताई हिवरखेडे , सुनीताताई नागपुरे , रुक्मिणीताई नागपुरे अनिताताई शिंगण सविताताई वानखडे यांनी सहकार्य केले कार्यक्रमाला पदाधिकारी सर्व ग्राम सखी व ग्राम संघातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता कु गायत्री निखाडे व कु ऋतुजा चव्हाण यांच्या शिवगर्जनेने झाली .