चिखला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वाद नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे जनतेला आवाहन
चिखला. लोणार....सोपान पाटील
लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे अज्ञात व्यक्तींनी बसविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता याप्रकरणी ३७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून आतापर्यंत २३ आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. २५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे राष्ट्रपतींच्या दौऱ्याचे निमित्त स्थळ पाहणी व बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनीही पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोंढा यांची उपस्थिती होती. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा शांतता अबाधित ठेवावी कसल्याही परिस्थीत कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये कुणाला काही अडचण असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांनी केले आहे.
