माटरगाव बु येथे गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली यांच्या स्वच्छता अभियान राबविण्यात आले - Maratha Darbar

Breaking

Monday, February 23, 2026

माटरगाव बु येथे गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली यांच्या स्वच्छता अभियान राबविण्यात आले

 माटरगाव बु येथे गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली यांच्या स्वच्छता अभियान राबविण्यात आले 


माटरगाव बु येथे भरारी व श्रीशक्ती महिला ग्राम संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ग्राम समृद्धीचे प्रणेते राष्ट्रसंत थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली व ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले सर्वप्रथम गाडगेमहराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले व त्यानंतर ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी सार्वजनिक रस्ते सार्वजनिक ठिकाणे  कन्या शाळा परिसर व रहिवाशी भागातील कचऱ्याची साफसफाई करण्यात आली अभियानामध्ये भरारी व श्री शक्ती ग्राम संघाचे पदाधिकारी मालुताई पांडव अलकाताई पांडे उषाताई गायकी उर्मिला रोटे दिपाली मिरगे नलिनी मिरगे गीता मिरगे उज्वला तांदूळकर शितल घुले  मनीषा भांबेरी   ग्राम सखी ज्योतीताई जगताप अनिताताई शिंगण सुनीताताई नागपुरे रुक्मिणीताई नागपुरे व ग्राम संघातील सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी ग्राम संघाच्या अध्यक्षा मालुताई पांडव यांनी स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करत प्लास्टिक वापर टाळणे व सार्वजनिक ठिकाणी कचरा न करण्याचे आवाहन केले.