**लोणार तालुक्यातील चिखला या गावात शिवजयंतीच्या दिवशी महिलांवर झालेल्या अत्याचारा निषेध व्यक्त करून दोशींवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली*
जळगाव जामोद : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामधील चिखला या गावात शिवजयंतीच्या दिवशी शिवाजी महाराज यांच्या पुतळा बसवण्याच्या घटनेवरून जो वाद झाला त्या वादामध्ये तेथील काही समाजकंटकांनी पुतळा बसविणाऱ्या महिलांवर प्राण घातक हल्ला करून त्यांचे कपडे फाळेपर्यंत जी मारझोड केली त्याबाबत निषेध व्यक्त करून दोषींवर क** कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी जळगाव जामोद शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली
ही गंभीर बाब असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी पक्षनेते स्वातीताई वाकेकर, रामविजय बुरुंगले,एड.अमर पाचपोर, अविनाश उमरकर, ज्योतीताई ढोकणे, एड भाऊसाहेब भालेराव,राजिव घुटे, एड.संदीप मानकर, बाबु भाई जमादार, डॉ शाकीर, अजहर देशमुख, भारसाकळे सर, एड रतन इंगळे, हुसेन राही, निलेश तायडे,
जुबेरोद्दीन पटेल
तुकाराम मुरलीधर गयोगोळ,
महेंद्र बोडखे,विनोद धंदर,
शंकर म्हस्के, दिनेश काटकर,गंभीर घट्टे, रामेश्वर पाटील, व कांग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
