पत्रकारावर जीवघेणा हल्ला करूनही आरोपी मोकाट"न्यायासाठी बसावे लागेल उपोषणाला!
“लोकशाही चौथा स्तंभ रक्तबंबाळ! बुलढाण्यात पत्रकारावर प्राणघातक हल्ला!
बुलढाणा : जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यातील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील कथित गैरप्रकार व अधिकाऱ्यांच्या अरेरावीविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकार शेख कदिर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
विशेष म्हणजे या गंभीर घटनेनंतरही आजतागायत कोणतीही ठोस पोलीस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिनांक 22 जुलै 2025 रोजी संग्रामपूर तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या पुरवठा अधिकारी यांनी गोरगरीब नागरिक व उपस्थित पत्रकारांशी अरेरावीची भाषा वापरून खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणाची लेखी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा विभाग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्रकार शेख कदिर यांनी सादर केली होती त्यानंतर पत्रकार संघटने कडून उपविभागीय अधिकारी, जळगाव जामोद यांच्याकडे दाखल केली होती.
या तक्रारीची चौकशी तामगाव पोलीस स्टेशनमध्ये 22 जुलै 2025 ची चौकशी 22 डिसेंबर 2025 रोजी तामगाव पोलीस स्टेशनला जबाबासाठी बोलावून आल्याचे पत्रकार शेख कदिर यांनी सांगितले.
या सर्व घडामोडींनंतर 22 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास, संग्रामपूर न्यायालयातून गावाकडे परतत असताना तीन अज्ञात व्यक्तींनी पत्रकार शेख कदिर यांची रस्त्यात अडवणूक केली.
“तू पुरवठा मॅडमविरोधात तक्रार करतोस? तुला खल्लास करतो!” अशी धमकी देत फावड्याने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वार चुकवताना त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले.
जखमी अवस्थेत त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी एम.एल.सी. नोंद केली . याबाबत तामगाव पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली असली तरी भीतीच्या वातावरणामुळे गुन्हा दाखल होऊ शकलेला नाही
महत्त्वाचे म्हणजे यापूर्वीच पत्रकाराच्या पत्नीने जीवाला धोका असल्याची लेखी तक्रार तामगाव पोलिसांकडे दिली होती. परंतु त्या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही कां?करण्यात आली नाही.तसेच घटनेच्या दिवशी 22 डिसेंबर रोजी पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयाकडेही ऑनलाईन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
तरीही एकाही आरोपीला अटक नाही, ना स्वतंत्र चौकशी—यामुळे राजकीय दबावाखाली पोलिस यंत्रणा काम करत असल्याचा आरोप होत आहे.
पत्रकार शेख कदिर यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की,
“भविष्यात मला किंवा माझ्या कुटुंबाला काहीही झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकारी व पोलीस प्रशासनाची असेल.”
न्याय न मिळाल्यास तामगाव पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला असून, या आंदोलनात राज्यातील पत्रकार संघटनांचा सहभाग असणार आहे.
