*मोताळा . दुचाकीची अमोरासमोर धडक दोन जण गंभीर जखमी*
*मोताळा*
प्राप्त व सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ७/२/२०२६ रोजी. अंदाजे ४:३० च्या सुमारास राजस्थान मार्बल समोर
दोन दुचाकी आमोरासमोर धडक झाल्याची घटना घडली
यात मोताळा येथील रहिवासी असलेले अजय किसन खर्चे वय अंदाजे ५० वर्ष ... ते पूर्वी बुलढाणा अर्बन बँकेत नोकरी करत होते आता त्यांनी स्वतःचा ड्रोन डिस्पोजल ग्लास पत्रावळ्या कागदी कप याचा व्यवसाय सुरू केला होता.. ते आपल्या इलेक्ट्रिक दुचाकी क्रमांक MH28BR 8748 वरून फाट्याकडून घराकडे येत होते असे प्रथम दर्शनी उपस्थित असलेल्यांचे म्हणणे आहे तसेच
विरुद्ध दिशेने येणार दुचाकी वर
पल्डग येथील रहिवाशी प्रवीण कैलास बावस्कर अंदाजे वय 23 वर्ष मंदा कृष्णा पुरकर 45 वर्ष तेजस्विनी पूरकर 14 वर्ष हे तिघेजण काही कामानिमित्त नरवेल येथे जात होते मात्र
राजस्थान मार्बल समोर दोघांचेही
अमोरासमोर जोरदार धडक झाली धडक इतकी भीषण होते की अजय खर्चे यांच्या इलेक्ट्रिक बाईचे समोरील चाक
पूर्णतः तुटले त्यामुळे ते जोरात रोडवर आपटल्या गेले त्यांच्या डोक्याला जबर मार लागला तसेच प्रवीण बावस्कर याला सुधा डोक्याला हाता पायाला भरपूर प्रमाणात मुक्कामार लागला व त्याच्यासोबत असलेले इतर दोन जण सुद्धा किरकोळ जखमी झाले त्यांना राजस्थान मार्बल चे मालक असलेले इकबाल सर यांच्या खाजगी गाडी द्वारे मोताळा येथील सरकारी दवाखान्यात व तेथून जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे
