श्री संत गजानन महाराजांचा 148 वा प्रकट दिन शिवशक्ती नगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरा... - Maratha Darbar

Breaking

Monday, February 9, 2026

श्री संत गजानन महाराजांचा 148 वा प्रकट दिन शिवशक्ती नगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरा...

 श्री संत गजानन महाराजांचा 148 वा प्रकट दिन




शिवशक्ती नगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरा...







मलकापूर:- शेगावचे श्री गजानन महाराज हे महान संत होते. दत्तसंप्रदायातील योगी म्हणून त्यांना ओळखले जाते. १८७८ फेब्रुवारी महिन्यात गजानन महाराज विदर्भातील शेगाव येथे दिगंबर अवस्थेत तारुण्यात पहिल्यांदा भक्तांना दिसले. त्यांनी कायम लोकांना सेवाभाव शिकवला. आपल्या लीलांनी अनेक चमत्कार गजानन महाराजांनी केले. कोणतेही अवडंबर न करता केवळ भक्तिमार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हेच त्यांनी दाखवले. "गण गण गणात बोते" हा मंत्र जगाला देणारे अवलिया महान संत श्री गजानन महाराज यांचा ८ फेब्रुवारी रोजी 148 वा प्रकटदिन सोहळा मलकापुरातील शिवशक्ती नगर मध्ये श्री संत गजानन महाराज सेवा समिती द्वारे साजरा करण्यात आला. श्रींचे दर्शन घेण्याकरिता भावनिक समाधान लाभते.प्रकट दिनानिमित्त मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आणि भक्तगणांनी भारावुन गेला होता.अभिषेक, महापूजा, हरिपाठ, भजन कीर्तन आधी धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हावून निघाला भाविकांची प्रचंड गर्दी मुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता दिनांक 5/2/2026 ते दिनांक 7/2/2026 रोजी पारायण करण्यात आले व 8/2/2026 पारायणाची सांगता करण्यात आली दुपारी 2 वाजता संपूर्ण परिसरातून पालखी मिरवणूक निघाली.सामूहिक आरती करुण संध्याकाळी 7 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता तरी सर्व राजकीय मंडळींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला श्री गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख समाधान व शांती नंदावी अशी भावना भक्तांनी व्यक्त केली