संभापूर एक गाव,तेथे नियमानुसार होत नाही एकही काम? काम सुरू, मात्र माहिती फलक गायब..! - Maratha Darbar

Breaking

Tuesday, February 10, 2026

संभापूर एक गाव,तेथे नियमानुसार होत नाही एकही काम? काम सुरू, मात्र माहिती फलक गायब..!

 संभापूर एक गाव,तेथे नियमानुसार होत नाही एकही काम?


काम सुरू, मात्र माहिती फलक गायब..!


काम सुरू, मात्र माहिती फलक गायब..!


संभापूर:- (अजयसिंह राजपूत) शासकीय विकासकामे सुरू होतानाच, म्हणजे काम प्रत्यक्षात चालू करण्यापूर्वी कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावणे अनिवार्य असते. या फलकांद्वारे कामाची पारदर्शकता टिकवून, कंत्राटदाराचे नाव, कामाचा खर्च, आणि मुदत यांसारखी माहिती नागरिकांना देणे अपेक्षित असते.

सार्वजनिक कामांच्या ठिकाणी: रस्ते, गटारे, इमारतींची दुरुस्ती, काँक्रिटीकरण,अशा ठिकाणच्या कामांवर हा फलक असणे गरजेचे आहे.संभापूर येथील मुख्य रस्त्याचे काम सुरू झाले असून विकासकामांची माहिती देणारे फलक लावलेले नाहीत. फलक न लावता ग्रामपंचायतींकडून ठेकेदारांना अभय दिले जात असल्याचे चित्र आहे.चांगली व दर्जेदार कामे झाली पाहिजेत, हाच केंद्र व राज्य शासनाचा उद्देश आहे. आरोग्य, स्वच्छ पाणी, शाळा, गटार, रस्ते असे विविध विकासकामे वेगवेगळ्या निधीतून केली जातात. योजनेतून एखादे विकासकाम करताना संबंधित कामाचे स्वरुप, त्याचे मोजमाप, लागणारा निधी, ठेकेदार कोण या सर्वाची माहिती असणारे फलक लावणे बंधनकारक आहे, असे फलक लावल्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून चांगली आणि दर्जेदार कामे होऊ शकतात. चुकीची कामे झाली तर ग्रामस्थ त्या ठेकेदाराला जाबही विचारू शकतात, मात्र संबंधित ग्रामपंचायतींकडून होत असलेल्या कोट्यवधींच्या विकासकामांचे फलक लावलेले नाहीत.जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग व ज्या-त्या पंचायत समित्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे एखाद्या कामावर खर्च झालेला निधी आणि प्रत्यक्ष काम यांची सांगड घातली तर अनेक ठिकाणी बिनकामाचा निधी खर्च झाल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून याचा पाठपुरावा करून ज्या-त्या कामाचे फलक लावले पाहिजे, अशी सक्ती केली पाहिजे. तसेच ग्रामस्थांनाही जे काम झाले ते कोणी केले, त्यावर किती निधी खर्च झाला याची माहिती मिळाली पाहिजे. याकडे लक्ष देऊन संबंधित अधिकारी कारवाई करतील का? असा प्रश्न उपस्थित झाला असून अनेक कामांच्या ठिकाणी हा नियम सर्रासपणे धुडकावला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.