बोराखडी पोलीस स्टेशन ची मोताळा शहरात अवैध धंदे करनारे माफीयांना खुली सुट हप्ता द्या चालुद्या - Maratha Darbar

Breaking

Tuesday, February 10, 2026

बोराखडी पोलीस स्टेशन ची मोताळा शहरात अवैध धंदे करनारे माफीयांना खुली सुट हप्ता द्या चालुद्या

बोराखडी पोलीस स्टेशन ची मोताळा शहरात अवैध धंदे करनारे माफीयांना खुली सुट हप्ता द्या चालुद्या 

(सोपान पाटील मोताळा)

बोराखडी पोलीस स्टेशन हद्दीतील मोताळा शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध देशी विदेशी दारू. विमल गुटखा वाहतूक व विक्रीसह,वरली मटकामुळे अल्पवयीन मुलांचे आणि महिलांचे भविष्य धोक्यात येत आहे.आजपर्यंत ग्रामीण भागात बरेचसे गंभीर गुन्हे चोरी, खून, विनयभंग सारखे गुन्हे दारुड्याकडून घडलेले आहेत, शाळकरी विद्यार्थी देखील मटका लावून हार जीतचा निकाल पाहण्यासाठी रांगेत उभे राहताना दिसत आहेत. मोताळा शहर व गावखेड्यातील चौक, हॉटेल्स, व बाजारपेठा वरली मटका जुगाराचे अवैध गुटखा केंद्र बनले आहेत.

मोताळा बोराखडी ठाणेदार श्री. मेहेत्रे साहेब . लहान मुलांचे व महिलांचे भविष्य वाचवा बोराखडी,पो,स्टेशनचे सर्व बिट इंचार्ज यांना त्वरित कारवाईचे आदेश देऊन अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करा ( अवैध धंदे करनारे यांची मोठी लीस्ट मोताळा शहरात बोराखडी पोलीस स्टेशन च्या आशिर्वादाने)