नांदुरा शहरातील वाहतूक शिस्त ढासळली शहरात ट्राफिक नियमांचे उल्लंघन
नांदुरा (अरुण सुरवाडे) – शहरात 2025 मध्ये तातडीने ट्रॅफिक शिस्त लावण्यासाठी रोज पैदल मार्च काडून लावलेली शिस्त. ठाणेदार पाटील साहेब बदलून गेले , त्यानंतर नांदुरा शहरातील वाहतुकीची शिस्त पुन्हा ढासळली आहे अशी परिस्थिती दिसत आहे.
गत वर्षी (2025) शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा प्रवाह वाढला असताना, प्रशासनाने एक अनुभवी ठाणेदार शहरात नेमला होता. त्या काळात ट्राफिक पोलीसांच्या मदतीने नियमांचे पालन करण्यासाठी वाहनांची वाहतूक सुकर करण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे बदल करण्यात आले होते. या काळात शहरातील मुख्य रस्त्यावरील गर्दीत सुधारणा, रस्त्यांवर योग्य चिन्हे व नियंत्रण यामुळे वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याची भावना वाढली होती.
पण काही महिने पूर्ण होताच त्या ठाणेदाराची दुसऱ्या ठिकाणी बदली झाली आणि त्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था पुन्हा पूर्व-स्थितीकडे परतल्याचे दिसत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की काही ठिकाणी वाहन (parking) अनियमितपणे होत आहे, ट्राफिक नियंत्रण यांसाठी नियमित तपासणी कमी झाल्यामुळे रस्त्यांवर गर्दी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नवीन आलेले ठाणेदार जयंत सातव यांनी पुन्हा एकदा योग्य वाहतूक व्यवस्था यावर वेळोवेळी लक्ष देण्याची गरज वाटत आहे.
विशेष म्हणजे, मागील काळात नांदुरा पोलीसांनी गुटखा जप्ती व तरुणांवर कारवाई यासारख्या इतर कायदेशीर कामांमध्येही सक्रिय भूमिका घेतली होती, पण आता वाहतूक शिस्त राखण्यासाठी नियमित व्यवस्था दिसत नसल्याने पोलीस प्रशासणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
