निमगाव येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्त व माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
निमगाव.... सोपान पाटील का. संपादक
जिल्हा परिषद केंद्र शाळा निमगाव मुले येथे दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी अकरा वाजता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त गावातील व विविध पदावर कार्यरत माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दुर्गा सिंग कुवारे यांनी केले या कार्यक्रमाकरिता शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सारंगधर इंगळे प्रशांत इंगळे जिल्हा परिषद उर्दू शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसीम राजा महात्मा फुले हायस्कूलचे अध्यक्ष परशराम इंगळे सर निमगाव चे सरपंच विकास भाऊ इंगळे उपसरपंच विजुभाऊ मु-हे महेंद्र भोपळे विजुभाऊ कुवारे व सर्व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते शाळेमध्ये ज्ञानार्जन करून विविध पदावर पोहोचलेले राजकारण व समाजकारणामध्ये प्रभावी असणारे विविध मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सर्वप्रथम सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम भाषण नाटिका नृत्य तसेच स्वागत गीत जिल्हा परिषदेचे शिक्षिका वानखडे ताई व वर्ग चौथा चे विद्यार्थ्यांनी सादर केले कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत या ठिकाणी करण्यात आले युवराज देशमुख प्रकाश झांबरे गुरुजी राजेंद्र दिवनाले साहेब निलेश भाऊ पाऊलझगडे अवधूत पाऊलझगडे सर कैलास बडे गजानन बुले डाॅ.प्रदीप गायकी रामचंद्र गावंडे जामोद गुरुजी यांनी या शाळेच्या आठवणीवर उजाळा टाकला डॉक्टर प्रदिप गायकी यांना साऊ ऐशयन ब्रि्लेयिंन्स अवार्ड मिळाल्याबद्दल माझी मुख्याध्यापक श्री पाउलझगडे महात्मा फुले हायस्कूल निमगाव यांनी सत्कार केला यावेळी शाळेच्या भौतिक सुविधा गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले याकरिता माजी विद्यार्थ्यांकडून संपूर्ण मदत मार्गदर्शन करण्याचे आश्वासन देण्यात आले याकरिता माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली त्यामध्ये युवराज देशमुख अध्यक्ष, राजेंद्र दिवनाले उपाध्यक्ष डाॅ.प्रदीप गायकी कोषाध्यक्ष ,रामचंद्र गावंडे सह कोषाध्यक्ष सचिव पदी मुख्याध्यापिका सौ निर्मला ताई थुबोकार, सहसचिव श्री दुर्गा सिंग कुवारे सर व सदस्य पदी सदस्य पदी श्री निलेश पाऊल झगडे श्री गजानन घुले प्रकाश झांबरे देविदास मानकर नानाभाऊ इंगळे गोपाल ढगे विवेक पाऊल झगडे योगेश धोटे गोपाल गावंडे कैलास बडे श्रीकृष्ण वानखडे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून अवधूत पाऊल झगडे तसेच जामोदे गुरुजी यांची निवड करण्यात आली श्री श्रीकृष्ण थुबोकार यांनी शाळेला दहा हजाराची मदत जाहीर केली सर्व मान्यवरांना चहापान व नाश्ता देण्यात आला यानंतर सौ संगीता कुवारे ताई यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका थुबोकार ताई सौ कुवारे ताई , सुकेशनी वानखडे ताई,विजया वानखडे ताई, श्री कुवारे सर व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा उपाध्यक्ष आणि बाबुराव शिवलकर प्रमोद खंडागळे विनोद देशमुख सर्व सदस्य यांनी मोलाचे योगदान दिले.
