*
वडी येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी*
नांदुरा... सोपान पाटील का. संपादक
आज दि.१२/०१/२०२६ रोजी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय वडी येथे राष्ट्रमाता जिजाऊ व युवक प्रणेते स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वसंत पाटील व प्रमुख पाहुणे सरपंच श्री संतोष घोराडे यांनी पावन प्रतिमेचे पुजन व हारार्पण केले. याप्रसंगी भूमीपुत्र श्री. अमोल पाटील यांनी राष्ट्रमाता जिजाऊ मातेच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. तर अध्यक्ष श्री वसंत पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना उजाळा दिला. प्रमुख पाहुण्यांनी स्वराज्य स्थापनेबद्दल माहिती दिली. याप्रसंगी श्री गोविंदा रावणकार, योगेश भोकरे, हर्ष गिरी, चेतन घोराडे, नमन भोकरे, असा मोठ्या संख्येत तरुण वर्ग उपस्थित होता.
याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन ग्रंथपाल श्री. प्रवीण गिरी यांनी तर आभार प्रदर्शन श्री. प्रमोद घोराडे यांनी केले. व कार्यक्रमाची सांगता झाली.
