फडणवीस शिवतीर्थावर कडाडले, केली ठाकरे बंधूंची पोलखोल, लाव रे तो व्हिडीओ म्हणत सगळंच बाहेर काढलं! - Maratha Darbar

Breaking

Monday, January 12, 2026

फडणवीस शिवतीर्थावर कडाडले, केली ठाकरे बंधूंची पोलखोल, लाव रे तो व्हिडीओ म्हणत सगळंच बाहेर काढलं!

 फडणवीस शिवतीर्थावर कडाडले, केली ठाकरे बंधूंची पोलखोल, लाव रे तो व्हिडीओ म्हणत सगळंच बाहेर काढलं!



प्रतिनिधी अरुण सुरवाडे


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी लावर रे तो व्हिडीओ असे म्हणत दोन्ही ठाकरे बंधूंमधील अगोदरचा वाद सर्वांसमोर दाखवला.

 : राज्यात महापालिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात एकूण 29 महापालिकांसाठी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. यंदा पालिका निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक केंद्रस्थानी आहे. मुंबईच्या पालिकेवर विजयी पताका फडकवण्यासाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत. जोमाने प्रचार करून मुंबईच्या लोकांना आकर्षित करण्याचा प्रचार केला जातोय. 11 जानेवारी रोजी मुंबईच्या शिवतीर्थावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची संयुक्त सभा झाली होती. आता याच सभेला उत्तर म्हणून शिवतीर्थावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्युत्तर सभा झाली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. विशेष म्हणजे फडणवीसांनी या सभेत राज ठाकरे यांच्याप्रमाणेच ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत ठाकरे बंधूंच्या युतीची खिल्ली उडवली.

देवेंद्र फडणवीस यांचा लाव रे तो व्हिडीओ

महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी आपण पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेचे व्हिडीओ लावले. या व्हिडीओमध्ये राज ठाकरे कधी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत असलेले तसेच उद्धव ठाकरे हेदेखील राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ल�