जिजाऊ सावित्रीबाईंच्या विचारांनी सजला भरारी ग्राम संघाचा हळदीकुंकू सोहळा - Maratha Darbar

Breaking

Monday, January 26, 2026

जिजाऊ सावित्रीबाईंच्या विचारांनी सजला भरारी ग्राम संघाचा हळदीकुंकू सोहळा

 जिजाऊ सावित्रीबाईंच्या विचारांनी सजला भरारी ग्राम संघाचा हळदीकुंकू सोहळा आज दिनांक 25/01/2026 रविवार रोजी भरारी महिला ग्राम संघाच्या वतीने महिला संमेलन व हळदीकुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले 

हळदी कुंकू म्हणजे केवळ परंपरेचा सोहळा नव्हे तर तो संस्काराचा विचारांचा , प्रेरणेचा उत्सव ठरला असाच एक प्रेरणादायी अनुभव माटरगाव येथील भरारी महिला ग्राम संघामध्ये पाहायला मिळाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे वाण समाजमनात रुजावे या उदात्त हेतूने ग्राम संघाने हळदीकुंकवाचे आयोजन केले कार्यक्रमाची सुरुवात राजमाता मासाहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली . त्यानंतर प्रमुख पाहुणे माजी सरपंच शुद्धमती ताई निखाडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारक कार्यावर प्रेरणादायक मार्गदर्शन केले. यावेळी सावित्रीबाईंची विचार हेच खरे वान  या संकल्पनेतून केवळ सुवाषिनींनाच हळदी कुंकू नव्हे तर एकल महिलांना सुद्धा हळदीकुंकू वाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. हा क्षण उपस्थित प्रत्येक महिलेसाठी भावनिक व प्रेरणादायी ठरला, तसेच या कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रथम व द्वितीय क्रमांकाला बक्षीस वितरण करण्यात आले . हळदी कुंकवामध्ये भेट वस्तू म्हणून सर्व महिलांना कुंडीचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामसंघाच्या अध्यक्षा उर्मिलाताई रोठे यांनी प्रत्येक सदस्यांनी या कुंडीमध्ये एक झाड लावावे व ते जगवावे म्हणजे आपल्याकडूनच वृक्षारोपणाचे एक खूप मोठे अभियान सुरू होईल आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून केले. या कार्यक्रमाला तेजस्विनी प्रभाग संघाच्या अध्यक्षा कावनपुरे ताई, ग्रामपंचायत सदस्य रूपालीताई तांबटकर , उषाताई गायकी , गोदावरीताई हिराळकर , उज्वलाताई मिरगे , नलिनीताई मिरगे , अश्विनीताई देशमुख, ग्राम सखी ज्योतीताई जगताप , रुक्मिणीताई नागपुरे, सुनीताताई नागपुरे, तसेच पूनम हिवरखेडे, प्रीतीताई बाजारे, आशा वर्कर्स, अंगणवाडी ताई व ग्राम संघातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पारंपारिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी कार्यक्रमात उत्साह आनंद व सांस्कृतिक सौंदर्याची भर घातली. अशाप्रकारे ग्राम संघातील महिलांनी हे आनंदाचे व परिवर्तनाचे वाण लुटले...