नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्याला मारहाण Psi घाटोळ याची गुंडागर्दी मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल. तक्रार नोंदवून न घेता PSI कडून चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप - Maratha Darbar

Breaking

Tuesday, January 27, 2026

नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्याला मारहाण Psi घाटोळ याची गुंडागर्दी मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल. तक्रार नोंदवून न घेता PSI कडून चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप

 नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्याला मारहाण Psi घाटोळ याची गुंडागर्दी मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल. 

तक्रार नोंदवून न घेता PSI कडून चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप



नांदुरा प्रतिनिधी

नांदुरा तालुका, जिल्हा बुलढाणा येथील माहिती अधिकार कार्यकर्ता गोपाल राधेश्याम नालट हे 

आज दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी नांदुरा पोलीस स्टेशन येथे सांडपाण्याबाबतची तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार घेण्यात न आल्याचा प्रकार समोर आला आहे.

तक्रार नोंदवून घेतली जात नसल्यामुळे गोपाल नालट यांनी घटनास्थळी व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली. यावेळी कर्तव्यावर असलेले पीएसआय घाटोळ यांनी संतापजनक वर्तन करत तक्रारदार गोपाल नालट यांना चापट व बुक्क्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांना जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये व माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कायदेशीर तक्रार घेण्याऐवजी तक्रारदारावरच मारहाण केली जाणे ही गंभीर बाब असून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, तसेच माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटना व नागरिकांकडून करण्यात येत आहे