नांदुरा : लाखो रुपयाची काळी कमाई लपवण्यासाठी पेन व डायरी देऊन पत्रकारांचा सत्कार की लोकशाहीचा चौथा स्तंभ नमवण्याचा प्रयत्न
(अरुण सुरवाडे नांदुरा )
नांदुरा (ता. नांदुरा, जि. बुलढाणा) | दिनांक : 6 जानेवारी 2026 रोजी पत्रकार दिनानिमित्त
नांदुरा पोलीस स्टेशनकडून कथित लाखो रुपयाची काळी कमाई व बेकायदेशीर व्यवहारांवर पडदा टाकण्यासाठी पत्रकारांचा सत्कार करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला नमवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या व काही पत्रकारांच्याही भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात असून, शहरात तीव्र चर्चा सुरू आहे.
, मागील काही दिवसांपासून पोलीस स्टेशनशी संबंधित विविध तक्रारी, अवैध व्यवहार व आर्थिक गैरव्यवहारांबाबत चर्चा सुरू होती. अशा पार्श्वभूमीवर पत्रकारांचा सत्कार आयोजित करून नकारात्मक बातम्या थांबवण्याचा व पोलिस प्रशासनाची प्रतिमा स्वच्छ करण्याच्या हेतूने पत्रकारांचा वापर करणे हे लोकशाहिच्या मूल्यांना धरून नसल्याने पत्रकारांची निर्भीडता डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे.विशेष म्हणजे या सत्कारासाठी कोणतेही स्पष्ट निकष, अधिकृत परिपत्रक नसल्याचे दिसून आल्याने नांदुरा पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आयोजित सत्कार कार्यक्रमास मोजक्या काही पत्रकारांनीही मारली दांडी ,....….
