माटरगाव येथे संविधान दीन साजरा करण्यात आला* - Maratha Darbar

Breaking

Wednesday, November 26, 2025

माटरगाव येथे संविधान दीन साजरा करण्यात आला*

 *

माटरगाव येथे संविधान दीन साजरा करण्यात आला*भारताच्या सर्व लोकांना कायद्याच्या समाजाच्या नीती नियमाच्या कक्षेत सामाजिक आर्थिक तसेच राजकीय हक्क मिळून देणाऱ्या भारतीय संविधान दिनाच्या दिवशी माटरगाव बुद्रुक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान दिन साजरा करण्यात यावेळी संविधान उद्देशिकेचे पत्रक नितीन वाकोडे यांनी वाटून कार्यक्रमाची सुरुवात सविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आली या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी वानखडे गुरुजी हे होते प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव गोपाळ भाऊ मिरगे पंचायत समिती माजी  सदस्य आणि आय एन खान ग्रामपंचायत माटरगाव ग्राम विकास अधिकारी आर आर सावरकर .रफिक भाई  तसेच यावेळी ग्रामपंचायत माटरगाव यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे सौंदर्यकरण करण्याकरता निधी देण्यात आला होता त्या कामाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रास्ताविक अनंत वानखडे गुरुजी यांनी केले तसेच प्रशांत तायडे यांनी सुद्धा यांचे मनोगत व्यक्त केले आर आर सावरकर साहेब यांनी सुद्धा आपले संविधाना विषयी आपले मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता दयाराम वानखडे,आनंद वानखडे, सरलेश वानखडे, दीपक, नरेश वानखडे ,अजय वाकोडे ,प्रशांत तायडे ,महिंद्रा वानखेडे ,आनंद वानखडे गुरुजी , विजय इंगळे त्यांनी सहकार्य विजय इंगळे यांनी संचालन केले व नितीन वाकोडे यांनी आभार प्रदर्शन केले.