माटरगांव बु येथे 26 नोव्हेंबर बुधवार रोजी भरारी महिला ग्राम संघाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम अध्यक्षा सौ मनीषा ताई भांबेरे यांच्या हस्ते संविधान दिनानिमित्त राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले उपस्थित असलेल्या सर्व महिलांनी भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन केले यानंतर 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी मनीषाताई भांबेरे इंदुताई गाडे, कमलबाई लोड , रूपाली देशमुख, ज्योती जगताप, रुक्मिणी नागपुरे, सुनिता नागपुरे, अनिता शिंगण , अनिता उमाळे , रत्नमालाढोरे तसेच समूहातील महिला उपस्थित होत्या ज्योतीताई जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आभार मानले .