*
भारत सरकार विधी न्याय व कंपनी मंत्रालय दिल्ली द्वारा मान्यता प्राप्त*,
*अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेची*
*(ग्राहक संरक्षण)*
बुलढाणा जिल्हा आढावा बैठक संपन्न
नांदुरा : आज दिनांक 23 रोजी सकाळी 11 वाजता नवीन बस स्टँड समोर पांडव मंगल कार्यालयाच्या बाजूला निधी अर्बन मागील हॉलमध्ये अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्षस्थानी
*महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. विनोद गायकवाड* हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदगोपाल पांडे , डॉ अभिमन्यू वानखेडे हे होते यावेळी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा महिला अध्यक्ष तथा जिल्ह्यातील सर्व महिला आणि पुरुष तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
