*बोराखडी पोलीस स्टेशन चे ट्राफीक
पोलीसांची तरवाडी फाट्याजवळ वसुली जोरात*। मा जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब बुलढाणा
विषय बोराखेडी पोलिस स्टेशन चे ट्राफिक पोलिस श्री दांडगे व त्यांचे साथीदार यांच्या वसुलीबाबत. आदरणीय महोदय बोराखेडी पोलिस स्टेशन चे श्री दांडगे व त्यांचे साथीदार दर सोमवार ला सकाळी ९ दुपारी १/२ वाजेपर्यंत अवैध वाहतूक ची वसुली करतात व या त्यांच्या वेळेस ट्रिपल सिट मोटारसायकल, IND नंबर नसलेल्या वाहने , हेल्मेट नसलेला बाईकस्वार ,लग्न घेऊन जाणारे वाहन वगैरे कडुन पैसे जमा करतात व साहेब विशेष म्हणजे यांचा MH21BD 0514 या मोटार सायकल नंबरप्लेट IND नाही व हे दांडगे साहेब स्वतः हेल्मेट वापरत नाही तरी आपणास विनंती हे व यांचे सहकारी तरवाडी गावाजवळ अधिकृत आले आहे का? यांची खरोखरच वाहन तपासणी साठी नियुक्ती केलेली आहे का व तशी बोराखेडी पोलिस स्टेशन डायरीत नोंद आहे का वगैरे बाबद चौकशी करण्यात यावी व सर्वसामान्य चा त्रास दूर करावा
