उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या
भ्रष्टाचारी कारभाराविरुद्ध आमरण उपोषण सुरू
(सोपान पाटील नांदुरा)
नांदुरा : आज दिनांक 15/10/2025 पासून भूमी अभिलेख कार्यालयाच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध तहसील कार्यालयासमोर किशोर इंगळे जिल्हाध्यक्ष रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया तथा संपादक विदर्भ टायगर यांची आजपासून उपोषण सुरू झाले आहे. सविस्तर असे की नांदुरा येथील भूमी अभिलेख कार्यालय येथे कार्यरत नगर भूमापक हे दस्त हस्तांतरतांची प्रक्रिया योग्य प्रकारे करीत नसल्यामुळे तसेच प्रचंड त्यांनी भ्रष्टाचारामुळे प्रमाणात करोडो रुपयांची अवैध संपत्ती गोळा केली आहे. यांची चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करावी व त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे तसेच नांदुरा येथील कार्यालयात नोंदविलेली दस्त हे नांदुरा मधून दस्त हस्तांतरण प्रक्रियेचा अवलंबून न करता नगर भूमापक हे साहेबांचा आयडी पासवर्ड घेऊन दस्त रद्द करतात व नगर भूमापक हे राखीव दलाला मार्फत पक्षकाराशी संपर्क करून ऑनलाईन दस्तानची मागणी करून आर्थिक गैरव्यवहार करतात या संपूर्ण गैरप्रकारची जिल्ह्याच्या बाहेरील त्री सदस्य समिती स्थापन करून दोषी कर्मचाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे नजूल विभागातील कर्मचारी अधिकारी दलाल यांचे बँक डिटेल, कॉल सी टी आर, फोन पे यांची तपासणी करण्यात यावी नजुल विभागातील कर्मचारी स्वतःच्या व नातविकाच्या नावे जिल्ह्यात व जिल्हा बाहेरील चल उचल संपत्तीची आयकर विभागामार्फत चौकशी करावी या मागण्या उपोषणकर्त्यांच्या आहेत


