अतिवष्टीचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना मदतीचा हात.. - Maratha Darbar

Breaking

Monday, October 6, 2025

अतिवष्टीचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना मदतीचा हात..

 


अतिवष्टीचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना मदतीचा हात..

मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधीस इंजि.सचिन तायडे व सौ.कोमलताई तायडे यांनी दिला एक महिन्याचा पगार


मलकापूर : राज्यात अनेक भागात ओला दुष्काळसदृ़श्य परिस्थिती असून शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशावेळी शेतकर्‍यांना सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत इंजि.सचिन तायडे यांनी एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधीसाठी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांचेमार्फत आज ६ ऑक्टोबर रोजी धनादेशाद्वारे दिला आहे.यावेळी तहसीलदार राहुल तायडे यांची उपस्थिती होती. 

राज्यात शेतकर्‍यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यांना सर्वांनी आपआपल्या परीने सर्वोतोपरी मदत करणे गरजेचे असल्याचे आवाहन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत इंजि.सचिन तायडे व सौ.कोमलताई तायडे या दांम्पत्याने शेतकर्‍यांना मदत म्हणून इंजि.सचिन तायडे यांचा एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधीस दिला असून यावेळी आपण स्वत: ग्रामीण भागातील रहिवासी असून लहान पणापासून शेतकर्‍यांचे कष्ट व निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांचे होत असलेले नुकसान आपण जवळून अनुभवत असल्याने देशाचा पोशिंदा संकटात असल्याने आपण त्याला छोटीशी मदत द्यावी, या हेतुने आपण एक महिन्याचा पगार मदत म्हणून पाठविला असल्याचे इंजि.सचिन तायडे यांनी सांगितले.

यावेळी त्यांचे समवेत एस.के.स्क्वेअर एंटरप्राईजेसच्या संचालिका, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ.कोमलताई तायडे यांचीही उपस्थिती होती.