*अवैद्य रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने तरुणीला चिरडले
*
नांदुरा.... सोपान पाटील मो. 7028259008
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेहु येथे आज सकाळी साडेसातच्या दरम्यान कुमारी गायत्री संजय खंडारे 15 वर्षीय मातंग समाजाची युवती शौचालयाला जात असताना भरधाव वेगाने अवैद्य वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने तिला चिरडले या घटनेची माहिती मिळताच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे संस्थापक विजयजी अंभोरे साहेब यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली व समाज बांधवांना
शांत करून डी वाय एस पी श्री महाजन यांना धारेवर धरून ऑन द स्पॉट एफआयआर घेण्यास भाग पाडले तसेच अवैद्य रेती वाहतूक करणाऱ्यांवर व त्यांना संरक्षण देणाऱ्या एसडीओ शिंदे, तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांचे वर कारवाई करण्यासाठी त्यांचे नाव एफआयआर मध्ये घेण्यात सांगितले आंदोलकांची समज काढून पंचनामा करून पोस्टमार्टम साठी मलकापूर येथे प्रेत पाठविण्यात आले व डीवायएसपी यांना आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यास सांगितले जर का कारवाई योग्य पद्धतीने न झाल्यास मातंग समाज तीव्र आंदोलन करेल असा त्यांनी इशारा सुद्धा दिला यावेळी अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे प्रदेशाध्यक्ष श्री सोपानराव पानपाटील प्रदेश सचिव सरचिटणीस तांबे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे विजयजी पारेकर महेंद्र वानखेडे रामा जाधव गणेश शिरसागर भालेरावताई प्रवीण अंभोरे संतोष बोरले भानुदास दांडगे राजू निकाळजे समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
