*नांदुरा शहरातील भीम नगर(खैवाडी)अंबा नगर,शिवराज नगर,रामनगर, सोफी बाग भागातील विविध समस्या तत्काळ सोडावा अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबनार*
नांदुरा:- सोपान पाटील मो. 7028259008
नांदुरा शहरातील भीम नगर,( खैवाडी )अंबा नगर,शिवराज नगर, रामनगर, सोफी बाग या भागातील रहिवासी यांनी आज न.प.मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.ज्यात नमूद आहे की.येथील नागरिक गेल्या ६० वर्षापासून या ठिकाणचे कायम रहिवासी आहे.या भागात अनेक समस्या आहेत.त्यांमधील सोफिबाग भागात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही,म्हणून ज्या ठिकाणी
पाईपलाईन नादुरुस्त आहे ती दुरुस्ती करून देण्यात यावी, गजानन तायडे यांच्या घराजवळ नवीन वाल टाकून देण्यात यावा,अंबानगर येथे हनुमान मंदिरापासून संतोष वानखडे यांच्या घरापर्यन्त पाणी जातनाही ते पाइपलाइन दुरुस्ती करून देण्यात यावी.
त्याचबरोबर भीम नगर व खैवाडी भागात नगर परिषद अंतर्गत दलितवस्थीमधे विविध विकासकामे सुरू आहेत.यामधे रस्ते,नाल्या व इतर कामांचा समावेश आहे.तसेच विकासकामे उर्वरित भागात सुद्धा तत्काळ सुरू करावे.२०२१ पासून भीम नगर खैवाडी,रामनगर भागात जे काम अपूर्ण आहेत ते वारंवार निवेदन व तोंडी सांगून सुद्धा पूर्ण होत नाही ते त्वरित चालू करण्यात यावे.तसेच अंबादेवी गड येथून प्रभाग क्रमांक सात मध्ये येणारे पाणी नियमित असलेल्या कर्मचारी सोडत नाही आणि पंधरा पंधरा दिवस दिसत सुद्धा नाही त्याची तिथून हकालपट्टी करून दुसरा कर्मचारी देण्यात यावा.अंबादेवी गडा जवळील घनकचरा उचलल्या जात नाही त्यामुळे तिथे दसरा दिवाळी सणामध्ये रोगराई पसरण्याचा खूप मोठा धोका आहे.वारंवार विनंती करून सुद्धा तो घनकचरा उचलला जात नाही तो घनकचरा सुद्धा त्वरित उचलण्यात यावा. प्रभाग क्रमांक ७ मधील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही तिथे पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे,प्रभाग क्रमांक ७ मधील उर्वरित भागात सुद्धा काँक्रिटीकरण करून देणे
( राजू वाकडे यांच्या घरापासून सरदार यांच्या घरापर्यंत.
राजू वाकोडे यांच्या घरापासून इसराइल बाबा यांच्या घरापर्यंत,
गौतम गवई यांच्या घरापासून वसीम पठाण यांच्या घरापर्यंत,
विशाल बोडके यांच्या घरापासून अंबा देवी गडामागील साईटने एकनाथ टेलर यांच्या घरापर्यंत , अंबादेवी गडामागील सार्वजनिक शौचालय येथील घाण कचरा उचलून घेण्याबाबत., उमेश गुजर नावाचा कर्मचारी आम्हाला नियमितपणे नळ सोडत नाही आणि दिसतही नाही करिता त्याची बदली करून देणे व दुसरा कर्मचारी नियुक्त करणे बाबत.,२०२१ पासून सुरू असलेले रामनगर येथील सार्वजनिक शौचाल अपुरे काम पूर्ण करावे
सदरील मागण्या तत्काळ पूर्ण न झाल्यास लवकरच स्थानिक रहिवासी आपल्या नगर परिषद कार्यालय नांदुरा येथे आमरण उपोषणाला बसतील याची नोंद घ्यावी. असे निवेदन आज नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले.यावेळी अर्जून वाकोडे,भागवत पेठकर,शेख इम्रान,पुंडलिक काळे,शेख अनिस,विजय वाकोडे,शेख इरफान,शेख अयास,समाधान वाकोडे,प्रमोद पोटे,विलास वाकोडे,अनंता रायपुरे,संतोष गंगतिरे,अजय बराठे,शिवा आमले,विशाल बोडखे,गणेश वसे, ऋषिकेश गंगतिरे,हर्षल वाकोडे, विशाल राजनकर,पवन वसे,रोहित भोपळे,अजय रोठे, मिलिंद इंगळे,अनिल इंगळे, भिमराव वाकोडे,निंबाजी पोटे उपस्थित होते
