नांदुरा नगराध्यक्ष पदासाठी सारीकाताई डागा ह्याच प्रमुख दावेदार ,,,,,,महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
(अरुण सुरवाडे नांदुरा)
नांदुरा नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव जाहीर झाल्यानंतर नांदुरा शहरातील निष्ठावंत आणि अनुभव संपन्न महिला कार्यकर्त्या सारिका ताई डागा यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे मागील वीस वर्षापासून पक्षासाठी प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या महिला कार्यकर्त्या सारिका ताई डागा ह्या नांदुरा नगराध्यक्ष पदासाठी सर्वात प्रबळ दावेदार आहेत
सारिका ताई डागा ह्या आमदार चैनसुख संचेती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कट्टर समर्थक असून मागील विधानसभा निवडणुकीत चैनसुख संचेती यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करून आणण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली त्यांच्या कार्यक्षमतेमुळे आणि महिला व युवकांमध्ये असलेल्या लोकप्रियतेमुळे पक्षात आणि सर्व समाजात विशेष ओळख मिळवलेली आहे भाजप कार्यकर्त्यांमध्ये सारिका ताई डागा यांच्या उमेदवारीस उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळेल त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या विकास कामासाठी नवे उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे शहरातील स्वच्छता, पायाभूत सुविधा युवकांना रोजगारीची संधी आणि सामाजिक विकास या सर्व बाबींमध्ये त्यांचा अनुभव व कार्यकुशलतेचा मोठा फायदा होईल अशी सर्वसामान्यमध्ये अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
