*नांदुरा येथे ऑनलाईन सेंटर वाल्याच्या मनमानी कारभार कलर प्रीट साठी 40 रु प्रति दर* - Maratha Darbar

Breaking

Sunday, October 12, 2025

*नांदुरा येथे ऑनलाईन सेंटर वाल्याच्या मनमानी कारभार कलर प्रीट साठी 40 रु प्रति दर*

(सोपान पाटील नांदुरा उपसंपादक) *नांदुरा येथे


ऑनलाईन सेंटर वाल्याच्या मनमानी कारभार कलर प्रीट साठी 40 रु प्रति दर*

नांदुरा.... तहसील कार्यलयासमोर असलेले सेतू केंद्र असून ते खूप मनमानी करत आहेत. आज दि. 12/10/2025 रोजी नांदुरा तहसील कार्यलयात अपंग लोकांसाठी कॅम्प सुरु असताना त्या अपंग लोकांना आधार कार्ड ची कलर प्रिंट साठी सेतू केंद्रावाले प्रति 40रु या प्रमाणे घेत आहेत.जय गजानन ऑनलाईन सर्विसेस व इतर यांना मी सोपान पाटील अ. भा. ग्रा. पत्रकार संघ तालुकाध्यक्ष तथा (दै. रायगड स्वाभिमान,मराठा दरबार, लेखणी शस्त्र, नारी शक्ती, क्राईम अपडेट  उपसंपादक),मी सेतू केंद्र चालकांना भेटलो असता ते म्हणतात की आम्हाला परवडत नाही तुमच्या कडून जे होईल ते करा असे म्हणत वाद केला. आणि अपंग लोकांची लुबाडणूक केली. अश्या केंद्रावर शासनाने कारवाई करून त्याचे केंद्र निलंबित करण्यात यावे.