शेगावमध्ये "हौसे-नवसे-गवसे" पत्रकारांचा वसुली हंगाम !
टोळी निघाली वसुलीसाठी; प्रशासन, व्यापारी
व खऱ्या पत्रकारांमध्ये खळबळ
शेगाव..... सोपान पाटील (उपसंपादक)मो. 7028259008
शेगाव, नांदुरा, खामगाव सह संपूर्ण बुलढाणा जिल्हात ही टोळी सक्रिय आहे.सणासुदीचा हंगाम सुरू होताच शहरात पुन्हा एकदा तथाकथित "हौसे, नवसे, गवसे" पत्रकारांची वसुली टोळी सक्रिय झाली आहे. खोट्या ओळखपत्रे, बनावट न्यूज पोर्टल आणि सोशल मीडियावरील कृत्रिम चॅनेलच्या माध्यमातून या टोळक्यांनी व्यापाऱ्यांकडून वसुली केली आहे. खरे पत्रकार आणि प्रशासन या प्रकारामुळे संतापले असून, शहरभरात चर्चा रंगली आहे.
पत्रकार नावाखाली वसुली
सणासुदीच्या कार्यक्रम, सामाजिक उपक्रम किंवा राजकीय भेटी याबाबतीत या तथाकथित पत्रकारांनी कन्व्हरेज देती "जाहिरात लावायची आहे" स्पेशल रिपोर्टिंग होणार"अश्या बहाण्याने दुकानदारापासून ते स्थानिक प्रतिष्ठितांपर्यंत सर्वांपासून पैसे उकळले आहेत. बरेच व्यापारी सांगतात की काही जण फोटो घेण्याच्या बहाण्याने किंवा सोशल मीडियावर टाकण्याचे कारण देउन ५०० ते १००० रुपये उकळतात. काही तर थेट धमकी देतात -
"जाहिरात दिली नाही तर नकारात्मक बातमी येईल।"
परवाना नाही, मान्यता नाही
या टोळीतील बहुतांश लोकांकडे पत्रकार परवाना नाही, कोणत्याही पत्रकार संघाचे सदस्यत्व नाही. तरीही ते स्वतःला "सीनियर रिपोर्टर", "मुख्य संपादक" किंवा "क्राइम ब्रांच रिपोर्टर म्हणून सादर करतात. या प्रकारामुळे खऱ्या पत्रकारांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.
एका वरिष्ठ पत्रकाराने म्हटले, "पत्रकारिता ही जबाबदारीची कामगिरी आहे; पण या प्रकारामुळे संपूर्ण क्षेत्राचे नाव धुतले जात आहे."
सोशल मीडियाचा गैरवापर आजकाल फेसबुक, पुट्यूब
आणि इन्स्टाम्रामवर कोणालाही 'न्यूज पोर्टल' सुरू करता येते. काही लोक मोबाइलवरून थेट लाईव्ह स्ट्रीम करून ब्रेकिंग न्यूज म्हणतात, तर काही या माध्यमांचा वापर चरून चसूली करतात. ब्लॅकमेलिंग,
धमकी आणि वसुली याचे प्रकार या माध्यमांवरून होत असल्याचे अनेक ठिकाणी समोर आले आहेत.
"कोणताही व्यक्तीकडे पत्रकार ओळखपत्र नसेल तर पैसे देऊ नका. निष्कर्ष
खरे पत्रकार हे सत्य मांडण्याचे, समाजाची सेवा करण्याचे काम करतात, परंतु "हौसे नवसे गवसे" पत्रकारांची टोळी फक्त वसुलीसाठी शहरात फिरत आहे. जर प्रशासन आणि नागरिकांनी याकडे लक्ष दिले नाही, तर हा प्रकार दिवसेंदिवस वाढणार आहे.
शेगावकरांनी सावध राहावे पत्रकार नावाचा "वसुली हंगाम सुरू आहे, सणासुदीच्या उत्सवात कैमेरा आणि माईक घेऊन टोळी निघाली आहे बातमी नाही, वसुलीसाठी!
