अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर, नागरिकांना नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन! तहसीलदार नांदुरा
(अरुण सुरवाडे नांदुरा)
नांदुरा तालुक्यात सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने व परिसरात अतिवृष्टी होत असल्याने, नद्या व नाल्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत असून, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, तहसीलदार, नांदुरा, यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना दिलेल्या सूचनांचे पालन करावे :
* नदीपात्रामध्ये किंवा पूर आलेल्या ठिकाणी कोणत्याही कारणास्तव उतरू नये.
* पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यास, धोका पत्करू नये. सेल्फी काढणे किंवा पोहण्याचा प्रयत्न करणे पूर्णपणे टाळावे.
* पूल किंवा साकवावरून पाणी वाहत असल्यास, तो रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.
* शेतकऱ्यांनी आपली जनावरे नदी किंवा नाल्यांच्या जवळ चरावयास सोडू नये.
* मासेमारी करणाऱ्या नागरिकांनी नदीपात्रात जाणे पूर्णपणे टाळावे.
* आपल्या मुला-बाळांना नदी, नाले, तलाव किंवा धोकादायक पाण्याजवळ जाण्यापासून परावृत्त करावे.
ज्या ठिकाणी पूर परिस्थिती गंभीर आहे, त्या भागातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा.
जनतेच्या सुरक्षेसाठी हे आवाहन करण्यात येत आहे. धोका टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे,
