बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी चांदूर बिस्वा येथे पशुधन स्टॉलला दिली भेट - Maratha Darbar

Breaking

Saturday, September 27, 2025

बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी चांदूर बिस्वा येथे पशुधन स्टॉलला दिली भेट

 


बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी चांदूर बिस्वा येथे पशुधन स्टॉलला दिली भेट 

(अरुण सुरवाडे नांदुरा)

महसूल विभाग ( तहसील कार्यालय) नांदुरांतर्गत 

27 नोव्हेंबर 2025 रोजी चांदूर बिस्वा येथे 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती नांदुरा मार्फत उभारण्यात आलेल्या स्टॉलला मा. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी भेट देऊन पशुसंवर्धन विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा व योजनांची माहिती जाणून घेतली. डॉक्टर एस.एन.साठे सहा. पशुधन विकास अधिकारी यांनी मा. जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच मा. जिल्हाधिकारी यांनी उत्कृष्टरित्या सादरीकरण केल्याने पशुसंवर्धन विभागाचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.एस.एन. साठे सहा. पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना चांदूर बिस्वा व परिचर विजय माळी यांनी परिश्रम घेतले