(राजु घाटे)शासकीय चित्रकला परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!
चांदुर बिस्वा : येथील यशवंत हायस्कुल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेचे व पालकांचे नाव उज्ज्वल केले आहे. नुकत्याच झालेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत विद्यार्थ्यांनी इ्लिमेंटरी व इंटरमिजीइट परीक्षे मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय गुण मिळवले आहेत.
शाळेतील एकूण 176 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता, त्यापैकी 48 विद्यार्थ्यांनी ‘विशेष प्राविण्य’ पटकवात ‘B श्रेणी’ मिळवली. परीक्षेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींमध्ये स्थिरचित्रे, स्मरणचित्र, द्विमिंत रेखाचित्रे आणि सर्जनशील कल्पनांचा समावेश होता. कला शिक्षक श्री भागवत काळे सर यांनी त्यांच्या रंगसंगती, रेखाटने व विषयाच्या सादरीकरणाबद्दल कौतुक केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री व्ही. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
"विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे हे यश आहे. त्यांना चित्रकलेसाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल," असे ते म्हणाले .
विद्यार्थ्यांचे हे यश शाळेसाठी अभिमानास्पद असून पालकवर्गानेही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पुढील स्पर्धांसाठी ते सज्ज झाले आहेत.
शाळेचे प्राचार्य मा. श्री. राठोड सर यांनी मुलांचे कौतुक करून मार्गदर्शक कला शिक्षकाचे अभिनंदन केले. व विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
