शंकर नगर मधील घरकुल धारकांना मुलभूत सुविध मिळत नसल्यामुळे वंचितचा न.प.वर मोर्चा धडकला
खामगाव- स्थानिक शंकर नगर भागातील घरकुल वासीयांनी मुलभूत सुविधा मिळत नसल्यामु आज २० जानेवारी २५ रोजी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे अज रामदास गवई यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. न.प. वर मोर्चा धडकला अस मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके उपस्थित नसल्यामुळे ठिय्या आंदोलन केले. काही वेळातच मुख्याधिक डॉ. शेळके कार्यालयात पोहचले होते. यावेळी अजय गवई यांच्या नेतृत्वात त्यांना विविध मागण्यांनिवेदन देण्यात आले. त्यामध्ये नमुद केले आहे की, नागरिकांना
घरकुल अधिकृत नावावर करून
द्यावे. घरकुल परिसरात पेव्हर
ब्लॉक बसवावे, परिसरातील
नाल्यांची साफसफाई करावी,
जुन्या सार्वजनिक शौचालयाची
दुरुस्ती करावी. तसेच नविन
सार्वजनिक शौचालय बांधावे,
नविन पाईपलाईन टाकुन
पाणीसमस्या सोडविण्यात यावी.
आदि मागण्यांचा समावेश आहे.
निवेदनावर घरकुल वासीयांच्या सह्या आहेत. यावेळी वंचित
बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवा
हिवराळे, धम्मा नितनवरे, अजय गवई, गीताताई नरवाडे, गौतम
नाईक, सौ. मिना समदुर, सुमन कांबळे, आशा बहुनिया आदि उपस्थित होते.