गोळेगाव बु. येथे सरपंचाच्या वर्तनामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यातः 26 जाने. पासून बेमुदत उपोषण (बुलढाणा प्रतीनिधी,):- शेगांव तालुक्यातील
गोळेगाव बु. येथील रहिवाशी असलेले मनोहर राजाराम गव्हाळे यांनी सरपंच व सचिव विरोधात गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, शेगाव येथे तक्रार अर्ज दाखल केला आहे त्यांच्या तक्रारीनुसार, सरपंचांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करत त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यास धोका निर्माण केला आहे. सदर तक्रारीमध्ये गव्हाळे यांनी त्यांचे
दोन घर असुन घर नं. ६३ आणि घर नं. २२५, एका रस्त्यावर आहेत. तर घर नं. ६३ समोरील नाली मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे, तसेच घरासमोर सार्वजनिक लाईटची सुविधादेखील उपलब्ध नाही. यासंदभांत मनोहर गव्हाळे
यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत व वरिश अधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज केले, मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. सरपंच यांनी पदाचा दुरुउपयोग करुन
दि. १४ जानेवारी २०२५ रोजी
रात्रीच्या वेळी सरपंचांनी गव्हाळे यांचे घर क्रमांक २२५ समोरचा चांगला रस्ता तोडून, गावातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाईप टाकला.
त्यामुळे संपूर्ण गावाचे सांडपाणी गव्हाळे यांच्या घरासमोर जमा होऊ लागले. या कारणामुळे त्यांच्या वरामध्ये पाणी शिरू लागले असून, सांडपाण्यामुळे आरोग्यास मोठा धोका
निर्माण झाला आहे.
मनोहर गव्हाळे यांनी सरपंचांनी यासंदर्भात विचारणा केली असता, सरपंचांनी कोणतेही समाधानकारक उत्तर न देता घटनास्थळावरून निघून गेले, नाइलाजाने गव्हाळे यांनी स्वतःच तो पाईप काढुन टाकला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायथ्याशी असलेल्या मोठ्या नाल्यात हा पाईप जोडणे शक्य होते; मात्र सरपंचांनी तसे न करता त्यांच्या घरासमोरच सांडपाण्याचा प्रवाह काढुन दिला .
गव्हाळे यांनी आपल्या तक्रार अर्जामध्ये नमूद केले आहे की, जर या प्रकरणावर तातडीने कार्यवाही झाली नाही, तर ते दि. २६ जानेवारी २०२५ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसतील, या उपोषणामुळे निर्माण होणान्या परिस्थितीस पंचायत समिती कार्यालय जवाबदार असेल,
गव्हाळे यांची मागणी:
1. सरपंच आणि संबंधित सचिव यांच्यावर योग्य ती
चौकशी करून कार्यवाही करावी.
2. त्यांच्या घरासमोर जमा होणारे संपूर्ण गावाचे सांडपाणी तत्काळ
दुसरीकडे वळविण्यात यावे
सदर घटनेमुळे सामान्य नागरिकामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. सरपंचांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करत एका कुटुंबावर अन्याय केला आहे, अशी ग्रामस्थांची भावना आहे
तक्रारीवर तातडीने कार्यवाही करून गव्हाळे कुटुंबाला दिलासा देणे, ही पंचायत समिती व मुख्य करुन गटविकास अधिकारी यांची जबाबदारी आहे. एका सामान्य कुंटुबाला जर एका सांडपाण्याच्या नाली साठी आमरण उपोषण करावे लागत असेल तर हे महाराष्ट्र राज्यासाठी खुप लाजीरवाणी गोष्ट आहे.
