*संत नगरी शेगांव येथून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्वातीताई वाकेकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन* *स्वातीताई वाकेकर यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे वाढली संजय कुटेना धास्ती* - Maratha Darbar

Breaking

Friday, November 8, 2024

*संत नगरी शेगांव येथून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्वातीताई वाकेकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन* *स्वातीताई वाकेकर यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे वाढली संजय कुटेना धास्ती*

 स्वाती वाकेकरच्यामुळे वाढली संजय कुटेना धास्ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, उध्दव ठाकरे मुळे आले


निवडणूकीला बळ. (शेगांव)बुलढाणा जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री पद भूषविलेला विधानसभा मतदारसंघ म्हणून जळगाव जामोद मतदारसंघाची डॉक्टर संजय कुटे यांच्यामुळे ओळख आहे परंतु मागील सत्ता कारणाची बाजू पाहता झालेल्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्रीपदापासून डॉक्टर संजय कुटे यांना लांब राहावे लागले त्यातच चालू असलेल्या विधानसभा निवडणूक मध्ये मातब्बर असलेले व विविध पक्षातून त्यांचा दांडगा संपर्क असलेले आमदार कृष्णराव इंगळे यांच्या कन्या डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांनी या निवडणुकीला संपूर्ण ताकदीनिशी कंबर कसंली डॉक्टर संजय कुटे यांच्यासमोर कडवे आवाहन त्यांनी उभे केले आहे त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज शेगाव येथे केले या अल्प कालावधीच्या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांना संपूर्ण जळगाव जामोद विधानसभेसह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची भरगच्च उपस्थिती ही डॉक्टर संजय कुटे यांना आवाहन ठरणार असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे