भूसंपादन कायदा २०१३ मुळे प्रकल्प बाधित शेतकरी बांधवांना योग्य मोबदला...ऍड व्ही व्ही साळुंके - Maratha Darbar

Breaking

Sunday, April 28, 2024

भूसंपादन कायदा २०१३ मुळे प्रकल्प बाधित शेतकरी बांधवांना योग्य मोबदला...ऍड व्ही व्ही साळुंके

 भूसंपादन कायदा २०१३ मुळे प्रकल्प बाधित शेतकरी बांधवांना योग्य मोबदला...ऍड व्ही व्ही साळुंके


ऍड सुधीर दळवी यांच्या विधी कार्यालयाच्या उद्घाटनाला सर्व क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी


गजानन डाबेराव

मराठा दरबार न्यूज

कार्यकारी संपादक बुलढाणा



नांदुरा :- काही वर्षांपासून नांदुरा तालुक्यात महत्वाकांक्षी जिगाव प्रकल्प साकारत आहे.यामध्ये प्रकल्पग्रस्तांचे भूसंपादन आणि पुनर्वसन होत आहे.नवीन भूसंपादन कायदा २०१३ मुळे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत आहे असे मत यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे माजी अध्यक्ष ऍड श्री व्ही,व्ही साळुंके यांनी यावेळी व्यक्त केले.

      दिनांक २८ एप्रिल रोजी नांदुरा येथे बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ऍड श्री आशिष देशमुख यांच्या हस्ते ऍड श्री सुधाकर दळवी यांच्या मलकापूर रोड वरील पी एम टॉवर स्थित विधी कार्यालयाचे उदघाटन संपन्न झाले.यावेळी  संस्कारमूर्ती आचार्य श्री हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी फित कापून विधी कार्यालय शुभप्रसंगी पूजन करून शुभाशीर्वाद दिले.यावेळी अनेक गनमान्य राजकीय,सामाजिक तसेच विधी क्षेत्रातील नामवंत व्यक्ती तसेच हजारो प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.

       बुलढाणा जिह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारा केंद्र शासन पुरस्कृत व अर्थसहाय प्राप्त महाराष्ट्र शासनाचा सिंचनाचा अनुशेष दूर करणारा खारपान पट्ट्यात हरितक्रांतीचे स्वप्न पल्लवीत करणारा विदर्भात दुसरा मोठा जिगाव प्रकल्प प्रस्तावित केला आहे, त्यातून शेतकरी समृद्ध व्हावा याकरिता नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे भूमिपुत्र शेतकऱ्यांची घरे व जमिनी संपादित होत असल्याने त्यांना कायदेशीर व समुपदेशन आणि सहकार्य करण्यासाठी या विधी  कार्यालयाची आम्ही येथे उभारणी करीत आहोत ,या माध्यमातून आम्ही शासन आणि प्रकल्प बाधितांचा समन्वय साधून प्रकल्पग्रस्तांचा भूसंपादन आणि पुनर्वसनाचा मार्ग सुलभ  करण्याला प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे यावेळी ऍड दळवी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात म्हणाले.यावेळी ऍड आशिष देशमुख,मा आमदार चैनसुख संचेती,यांनी सुद्धा समयोचित भाषणे झाली.यावेळी सर्व क्षेत्रातील नामवंत व्यक्तीची उपस्थित होती .तसेच सर्वच पक्षातील राजकीय नेते मंडळी सुद्धा एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाली यामध्ये विद्यमान 

आमदार राजेश ऐकडे, माजी आमदार चैनसुख सुख संचेती ,श्री प्रसेनजीत पाटील,शिवचंद्र तायडे , वसंतराव भोजने,एड विजय सावळे,ऍड गोपाळराव कळमकर, ऍड विशाल कदम,श्री प्रकाश पाटील ,श्री ज्ञानेश्वर दादा पाटील,श्री संदीप शेळके, संतोष रायपुरे ,शिवाजीराव पाटील,मोहन पाटील,भगवान धांडे ,अजिंक्य चोपडे,संदीप पाटील ,संतोष डीवरे, शांताराम दाणे,केदार ढोरे ,राजेश गावंडे यासह जिल्ह्यातील हजारो प्रकल्प ग्रस्त ,आणि शेतकरी  बांधव उपस्थित होते .यावेळी सर्व प्रमुख पाहुणे व प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधवांचे ऍड अनंता शिवाजीराव देशमुख व ऍड अमित प्रकाश पाटील यांनी आभार व्यक्त केले .