नांदुरा पोलीस स्टेशन येथे डीजे चालक मालकांची बैठक संपन्न - Maratha Darbar

Breaking

Monday, April 29, 2024

नांदुरा पोलीस स्टेशन येथे डीजे चालक मालकांची बैठक संपन्न

 नांदुरा पोलीस स्टेशन येथे डीजे चालक मालकांची बैठक संपन्न 


गजानन डाबेराव

मराठा दरबार


न्यूज

कार्यकारी संपादक बुलढाणा


नांदुरा :- दिनांक 29/04/2024 रोजी 11/30 वा ते 12/00 वा  दरम्यान माप ओनिसा यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस स्टेशन नांदुरा येथे नांदुरा शहर तसेच नांदुरा तालुक्यातील  D J  चालक-मालक यांची मीटिंग घेण्यात आली.

मीटिंग दरम्यान सूचना देण्यात आल्या त्या खालील प्रमाणे. 

1. कुठल्याही कार्यक्रमाची  पोलिसांकडून परवानगी घेतल्याशिवाय डीजे वाद्य वाजवू नये. 

2. शासनाने ठरवून दिलेल्या क्षमतेमध्येच वाद्य वाजवावे.

3. आगामी काळात येणारे लग्न मिरवणुका यामध्ये परवानगी घेतल्याशिवाय डीजे वाजू नये. 

4. धार्मिक तेढ निर्माण करणारे कुठलाही प्रकारचे गाणे वाजू नये ज्यामुळे कायदा व स्वस्त प्रश्न निर्माण होईल. 

5. आपल्याकडे असलेल्या वाहनांची कागदपत्रे पोलीस स्टेशन येथे आणून जमा करावे. 

6. वाहनातील स्पीकर्स किंवा डीजेचे साहित्य वाहनापेक्षा मोठे किंवा आडवे बाहेर निघालेले नसावे जेणेकरून रहदारी सळसळा निर्माण होणार नाही. 

7. ज्या मिरवणूक मार्गाने मिरवणूक निघणार आहे त्या मार्गाची स्वतः जाऊन पाहणी करावी आपले वाहन निघते किंवा कसे याबद्दल शहानिशा करावे. 

8. लग्न समारंभात संदर्भाने मिरवणुकी दरम्यान कुठल्याही धार्मिक स्थळाजवळ जास्त वेळ गाणे वाजवू नये धार्मिक व सांप्रदायिक गाणे वाजू नये मिरवणूक एका जागी जास्त वेळ थांबू देऊ नये. 

तसेच इतर योग्य त्या सूचना देण्यात आल्या. जमाव 15 ते 20 हजर