ग्रामपंचायत कार्यालय व पी एम श्री जिल्हा परिषद शाळा नारखेड येथे १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहन
गजानन डाबेराव
मराठा दरबार न्यूज
कार्यकारी संपादक बुलढाणा
नारखेड :- ग्रामपंचायत कार्यालय व पीएमश्री उच्च माध्यमिक शाळा नारखेड येथे आज दिनांक ०१ मे २०२४ रोजी सकाळी आठ वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच प्रसेनजित खंडेराव यांच्या हस्ते १में महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर पीएमश्री उच्च प्राथमिक मराठी जिल्हा परिषद शाळा नारखेड येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकुलसिंग डाबेराव यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपसरपंच बबीता डाबेराव ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री गजानन डाबेराव शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष स्वातीताई फुंडकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अरुण गाडे वासुदेव फेरण शत्रुघन डाबेराव संगणक परिचालक प्रवीण इंगळे पी एम श्री शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र आखरे तांदूळकर सर गजानन तायडे सर कवडे सर शिक्षक वृंद शिक्षिका तसेच अंगणवाडी सेविका सीमा तायडे संगीता राजपूत पुष्पाताई सुशीर सविता तांदळे शारदा रोजतकार ज्योती डाबेराव तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक रघुवीर सुशीर नरसिंग डाबेराव पीएमश्री शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र आखरे सर यांनी वर्ग १ ते ८ पर्यंत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा निकाल जाहीर करून सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्याचे जाहीर केले व पुढील सत्राच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी पालक व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती लाभली होती.
